Vanchit News

मटका अड्ड्यावर धाड दोघांवर कारवाई.वंचित न्यूज चॅनल : दिनांक:- 28/12/2022 सहसंपादक :- श्रीरंग कांबळे. चंदगड:- चंदगड तालुक्यातील पाटणे फाट्या नजीकच्या स्वागत मटन शॉप चे बाजूला सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर चंदगड पोलिसांनी धाड टाकली.या कारवाईत एकूण 11165 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आणि दोघांवर गुन्हा दाखल केला.दोन दिवसापूर्वी पोलिसांनी ही कारवाई केली.धाकलू तुकाराम नाईक वय 30 राहणार हलकर्णी तालुका चंदगड आणि भुजंग मष्णू नाईक राहणार हलकर्णी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर अशी आरोपींची नावे आहेत.याबाबत सुरेश जयवंत भदर्गे पो. ना.103 यांनी फिर्याद दिली तर मुंबई जुगार कायदा कलम 12(आ) प्रमाणे ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी दिनांक 26 12 2022 रोजी 19.30 वाजण्याच्या सुमारास पाटणे फाटा येथील स्वागत मटन शॉप चे बाजूला उघड्यावर मुंबई मटका घेत असताना यातील दोघांना पोलिसांनी अटक केले.पोलीस हेड कॉन्स्टेबल 243 सुतार यांनी गुन्हा दाखल केला.तर अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल1533 सरंबळे अधिक तपास करत आहेत.


Vanchit News