Vanchit News

अल्पवयीन चुलत बहिणीवर अत्याचार आरोपीची बालसुधारगृहात रवानगी.वंचित न्यूज चॅनल : शाहूवाडी तालुका प्रतिनिधी:- सखाराम कांबळे. मलकापूर :- शाहूवाडी तालुक्यातील कडवे इथ अल्पवयीन चुलत बहिणीवर वारंवार अत्याचार होत होते.यामध्ये आरोपी असलेल्या तरुणाला शाहूवाडी पोलिसांनी अटक केली.तसेच कोल्हापूर येथील जिल्हा विशेष ( पोस्को) न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता आरोपीस न्यायालयाने बालसुधारगृहात पाठविण्याचे आदेश दिले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलीच्या आईने शाहूवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीने अल्पवयीन मुलीला घरी एकटीला गाठून तिच्यावर मे ते जुलै 2022 पर्यंत जबरदस्तीने तिच्याशी संबंध ठेवले.याबाबत कुणाला काही सांगितल्यास तुझी बदनामी करेन अशी धमकी देखील आरोपीने पेडीतेस दिली होती.दरम्यान या लेंगिक अत्याचारामुळे सबंधित मुलीला दिवस गेले पीडितेला शारीरिक त्रास झाल्याने मुलीला शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले. शारीरिक तपासणी नंतर या गुन्ह्याला अखेर वाचा फुटली याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शाहूवाडी पोलिसात वर्दी दिली.सदर घटनेची पीडितेच्या आईने गुरुवारी दि 29 डिसेंबर रोजी पोलिसात फिर्याद दाखल केली होती .शुक्रवारी दि.30डिसेंबर रोजी कोल्हापूर जिल्हा विशेष न्यायालयाने आरोपीला अल्पवयीन असल्याने बालसुधारगृहात पाठविण्याचे आदेश दिले.सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलजा पाटील अधिक तपास करत आहेत.


Vanchit News