Vanchit News

अथर्व – दौलत साखर कारखान्याची बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा.वंचित न्यूज चॅनेल: कोल्हापूर: सह संपादक श्रीरंग कांबळे: अथर्व इंटरट्रेड प्रा.लिमिटेड लिज्ड युनिट दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. हलकर्णी कारखान्याची 16 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2022 अखेरची ऊस बिले व तोडणी वाहतुक बिले बँक खात्यावर जमा केली असल्याचे अथर्व इंटरट्रेड कंपनीचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.कारखान्याचा 2022-23 चा गळीत हंगाम यशस्विरित्या सुरु असून, आजअखेर 235340 मे. टनाचे गाळप पुर्ण झाले आहे. त्यासाठी अथर्व दौलत कारखान्याला सभासद / शेतकरी, तोडणी ओढणी कंत्राटदार अधिकारी व कामगार यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. शेती विभागामार्फत ऊस आणण्याचे उत्तमरित्या नियोजन केले असून भागातील ऊस उत्पादक सभासद, कामगार यांनी आपला संपूर्ण ऊस अथर्व दौलतला पाठवावा दरवर्षीप्रमाणे कारखान्यामार्फत उच्च प्रतिचे व गुणवत्ता योग्य कंपोष्ट खत तयार केले असून ते शेतक-यांना प्रति मे.टन रु.630/- याप्रमाणे माफक दरात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावेळी कारखाना संचालक विजय पाटील, युनिट हेड ए. आर. पाटील, सेक्रेटरी विजय मराठे, जनसंपर्क अधिकारी दयानंद देवाण, फायनान्स मॅनेजर सुनिल चव्हाण, मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील व कारखान्याचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.


Vanchit News