Vanchit News

नॅनो तंत्रज्ञानात विद्यार्थ्यांना प्रचंड करिअर संधी उपलब्ध – प्रा. किम.वंचित न्यूज चॅनेल: सहसंपादक :- श्रीरंग कांबळे. दिनांक:- 18/1/2023 कोल्हापूर: - विद्यार्थ्यांनी संशोधन अभिवृत्ती जोपासायला हवी. सध्या शास्त्रज्ञांनी नॅनो पदार्थांचा वापर करून नॅनोक्रांती घडवून आणली आहे.ज्याचा उपयोग सर्वसामान्य व्यक्तीला होत आहे.या क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांना परदेशात अनेक संधी उपलब्ध आहेत. असे प्रतिपादन चोन्नम नॅशनल युनिव्हर्सिटी, दक्षिण कोरियाचे प्रा.डॉ.जे.एच.किम यांनी केले. डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ आयोजित आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. किम पुढे म्हणाले” भारतातील विद्यार्थी हे खूप होतकरु आहेत. त्यांना संशोधनाची आवड आहे व त्यांना संशोधनासाठी दक्षिण कोरियातील दरवाजे सदैव खुली असल्याचे मनोगतात सांगितले.यावेळी क्वीनसलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी ऑस्ट्रेलियाचे संशोधक प्रा.दीपक डूबल,कुलगुरू डॉ के.प्रथापन, कुलसचिव डॉ.जे.ए.खोत, डॉ.गुरुनाथ मोटे, डॉ. जयंत घाटगे, डॉ.संदीप वाटेगावकर, डॉ.तानाजी भोसले आदी मान्यवर, विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ.संदीप वाटेगावकर यांनी या चर्चासत्राचा उद्देश व महत्व विशद करून दिले.डॉ.दीपक डुबल म्हणाले ” जिद्द मेहनत व चिकाटी असेल तर कोणतेही यश दूर नाही. प्रबळ महत्वकांक्षा असणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सतत नाविन्याचा ध्यास घेणे गरजेचे आहे. यानंतर कुलगुरू डॉ. के.प्रथापन म्हणाले ” भविष्यात आम्ही ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया येथील विद्यापीठासोबत एकत्रित संशोधन प्रकल्प राबवू व त्यासाठी विद्यापीठाकडून लागेल ती मदत पुरवू असे आश्वासन दिले.कुलसचिव डॉ. जे ए. खोत यांनी या चर्चासत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल व या शास्त्रज्ञांच्या माध्यमातून या विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकेल अशी आशा व्यक्त केली. चर्चासत्रात सानिका पाटील व वैभव हेरवाडे यांनी प्रा.किम यांचे हुबेहूब काढलेले चित्र फ्रेम च्या स्वरूपात त्यांना प्रदान केले. चर्चासत्रासाठी २०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता.हे चर्चासत्र यशस्वीरीत्या आयोजित करण्यासाठी असोसिएट डीन डॉ.गुरुनाथ मोटे, डॉ. संदीप वाटेगावकर व डॉ.तानाजी भोसले यांनी अथक परिश्रम घेतले.तसेच शिवाजी विद्यापीठाचे प्रा-कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील, डॉ.शिवाजी सादळे, डॉ.नामदेव हराळे यांचे सहकार्य लाभले. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आनंद व्यक्त केला.


Vanchit News