Vanchit News

तुडये येथून विवाहित महिला बेपत्ता.वंचित न्यूज चॅनल : सहसंपादक:- श्रीरंग कांबळे. दिनांक:- 23/1/2023. चंदगड / कोल्हापूर तुडये तालुका चंदगड येथील सौ.कीर्ती राहुल हुलजी वय वर्षे 19 राहत्या घरातून कुणालाही न सांगता घरातून निघून गेली आहे. ही घटना दिनांक 15 /1/2023 रोजी पहाटे 5 ते 5.30 च्या दरम्यान घडली असून बेपत्ता महिलेचा पती राहुल विनायक हुलजी रा.तुडये यांनी चंदगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कारंडे करत आहेत. मिसिंग महिलेचे वर्णन सौ.कीर्ती राहुल हुलजी वय वर्षे 19 रा.तुडये ता.चंदगड जि. कोल्हापूर रंगाने निमगोरी,उंची 5 ×3 इंच नाक सरळ,केस काळे लांब,कपाळावर टिकलीचे गोंदण,अंगात गुलाबी रंगाचा टॉप व काळ्या रंगाची लेगिन्स, राखाडी रंगाचे जॅकेट ,कानात साधी कर्णफुले, पायात पैंजण व गुलाबी रंगाची सॅंडल,मराठी व हिंदी भाषा बोलते. वरील वर्णनाची बेपत्ता महिला मिळून आल्यास चंदगड पोलीस ठाणे – 02320-224133 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.


Vanchit News