Vanchit News

अकलूजचे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील यांच्या हस्ते पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नूतन युवक प्रदेशाध्यक्षांचा सत्कार.वंचित न्यूज चॅनेल: श्रीपूर- महळूंग प्रतिनिधी: रंजीत बाबर. राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार जोगेंद्र कवाडे सर राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे व राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टी(PRP)च्या महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्षपदी अकलूज येथील सोमनाथ अरुण भोसले यांची निवड झालेबद्दल शासकीय विश्रामगृह अकलूज येथे बुधवार 3 मार्च रोजी अकलूजचे माजी सरपंच मा.किशोरसिंह माने-पाटील,मातंग समाजाचे जेष्ठ नेते मा.शंकर साठे व देशपांडे काका यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी किशोरसिंह माने पाटील यांनी सोमनाथ भोसले यांचे सामाजिक कार्य चांगले असून आंबेडकरी चळवळीतील सर्वात मोठे पद पहिल्यांदाच आपल्या अकलूज गावाला सोमनाथ भोसले यांच्या रूपाने मिळाले आहे त्यामुळे त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या असल्याचे सांगितले. सत्काराला उत्तर देताना नूतन युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी मा.किशोरसिंह माने पाटील,मातंग समाजाचे जेष्ठ नेते मा.शंकर साठे व देशपांडे काका यांनी वेळात वेळ काढून शुभेच्छा दिल्याबद्दल आभार मानून पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण ताकदीने पार पाडून अकलूजचे नाव आणखी मोठे करणार असल्याचे सांगितले. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुकाध्यक्ष सचिन कांबळे,युवक तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड,युवक तालुका संपर्कप्रमुख शिवम गायकवाड, अकलूज शहर संपर्कप्रमुख शिवाजी खडतरे,जावेद शेख,ऋतुराज थोरात आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


Vanchit News