Vanchit News

शेटफळ हवेली तालुका इंदापूर येथील सरपंच सौ रुपाली संतोष पवार यांच्या सरपंच पदावर अतिक्रमणामुळे अपात्रतेची कारवाई.



वंचित न्यूज चैनल: उपसंपादक: सतीश जगताप. दि.२७/०३/२०२३. इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली ग्रामपंचायतच्या सरपंच सौ रूपाली संतोष पवार यांच्यावरती मा. जिल्हाधिकारी यांच्याकडून अपात्रतेची कारवाई. शेटफळे हवेली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन ज्ञानदेव शिंदे यांनी शेटफळ हवेलीच्या सरपंच सौ रुपाली संतोष पवार यांच्याविरुद्ध मा. जिल्हा अधिकारी राजश देशमुख यांच्या कोर्टात सरपंचाने अतिक्रमण केल्याची लेखी तक्रार व सबळ पुरावे सादर केले होते. सचिन ज्ञावदेव शिंदे यांच्या तक्रारी अर्जामध्ये शेटफळ हवेली गावाच्या पश्चिमेस गायरान गट नंबर 635 मध्यें तीस आर ईतक्या क्षेत्रा वरती सरपंच सौ रूपाली पवार यांचे सासरे श्री मच्छिंद्र एकनाथ पवार यानी अतिक्रमण केलेची तक्रार तक्रारी अर्जामध्ये केली होती. त्या अनुषंगाने तपासणी केली असता तशा प्रकारच्या नोंदी इंदापूर तहसीलच्या गाव नमुना नंबर एक/ ई या नोंदवहीत स्पष्टपणे 30 गुंठे अतिक्रमण व दोन आर क्षेत्रावरती घर अशी नोंद आढळून आल्याने व सदर गायरान गटाची मोजणी करू नये यासाठी सरपंचांचे पती संतोष पवार यांनी पत्नी सरपंच असल्याचा गैरफायदा घेऊंन शासकीय गायरान गटाच्या जमिनीवरती अतिक्रमण केल्याचे व सदर गटाचे मोजणी होऊच नये यासाठीं त्यांनीं स्वतः खोट्या सह्या करून सरपंचाचे अधिकार वापरले या सर्व बाबी लक्षात घेऊन जिल्हा अधिकारी राजेश देशमुख साहेब तांच्या कोर्टात सौ रूपाली संतोश पवार या कारवाई पात्र आहेत असें ठरवून त्यांच्यावरची सरपंच व सदस्यता पदकाच्या अपात्रता ची कारवाई करण्यांत आली.






Vanchit News