Vanchit News

इंदापूर पोलिसांनी पकडला लाखो रुपयांचा अवैध गुटखा .



वंचित न्यूज चैनल : उपसंपादक: सतीश जगताप. दि.३०/०३/२०२३. इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीत अकलूज ते इंदापूर महामार्गावरून अवैद्य प्रतिबंधित सुगंधी पान मसाला गुटखा याची बेकायदेशीरित्या वाहतूक होत असले बाबत गोपनीय माहिती इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना प्राप्त झाली. सदर माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे , पोलीस हवालदार बालगुडे व पोलीस शिपाई राखुंडे असे मिळून पथक कारवाई करीता रवाना केले. सदर पथकाने दि.29/03/2023 रोजी रात्रो 09/00 वाजता दरम्यान बावडा ते इंदापूर महामार्गावरती सापळा रुचून एक संशयित पिकप गाडी गाडी नंबर MH 13 DQ 2496 येताना दिसला असता त्यास हात दाखवून बाजूला घेण्यास सांगितले. त्या गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये मानवी जीवितास अपायकारक असा अवैध प्रतिबंधित सुगंधी पान मसाला गुटखा 1808800/- रुपये किमतीचा मुद्देमाल व एक जुनी वापरती पिकप 600000/-रुपये किमतीची असा एकूण 2408800/-रुपये किमतीचा मुद्देमाल सदर कारवाई मध्ये जप्त करण्यात आला. गाडी चालक व त्याचा साथीदार दोघांना ताब्यात घेऊन इंदापूर पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता, अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 तसेच महाराष्ट्र राज्य अन्न व सुरक्षा आयुक्त यांचा प्रतिबंधित आदेश चे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यांमध्ये गाडी चालक व त्याचा साथीदार याला अटक करून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील हे करीत आहेत. सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय श्री. अंकित गोयल साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती श्री. आनंद भोईटे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग श्री गणेश इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, योगेश लंगुटे, पोलीस हवालदार बालगुडे, पोलीस शिपाई विकास राखुंडे यांनी मिळून केली.






Vanchit News