आदर्श गाव व आदर्श शाळा शिक्षकांची बदली होत असल्याने समस्त ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने चक्क शिक्षकांचा सत्कार केला.

वंचित न्यूज चॅनल : कोकण विभाग प्रमुख:- सखाराम कांबळे. दिनांक :- 1/5/2023. शाहूवाडी :- आंबा पैकी केर्ले गावामध्ये विद्या मंदिर केर्ले ता. शाहूवाडी या शाळेचे मुख्याध्यापक श्री आकुळवड सर आणि श्री भांगडे सर यांच्या बदली निमित्त शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने निरोप समारंभ घेण्यात आला श्री आकुळवड सर गेली 10 वर्षे आणि भांगडे सर 7वर्षे शाळेमध्ये मुलांना शिक्षणाबरोबर त्यांना स्पर्धा परीक्षेबद्दल मार्गदर्शन करणे किंवा गावातील ग्रामस्थांच्या मदतीने शाळेचे सुशोभीकरण करणे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ग्रामस्थ मध्ये सलोखा साधून उत्कृष्ट विद्यार्थी घडविण्याचे काम या दोन शिक्षकांनी केले आहे समारंभ वेळी केर्ले गावचे सरपंच सौ नंदिनी पाटील माजी सरपंच शिवाजी पाटील तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री प्रकाश शिंदे राजू बडमे श्री दीपक तावरे त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख श्री लाड सर तसेच श्री संदीप जाधव बापू जाधव सिद्धार्थ कांबळे उपस्थित होते श्री प्रदीप तावरे श्री मंगेश कांबळे प्रकाश शिंदे यांनी मनोगत व्यक्त करून सरांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.