Vanchit News

1 मे कामगार दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र आंबा येथे ध्वजारोहण व विविध कार्यक्रम पार पडले.वंचित न्यूज चॅनल : कोकण विभाग प्रमुख :- सखाराम कांबळे. दिनांक:- 1/ 5/2023. शाहुवाडी:- 1मे रोजी कामगार दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र आंबा तालुका शाहूवाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यामध्ये यंग जनरेशन यांनी आपला पूर्ण वेळ शिक्षणाकडे देऊन आदर्श व नवीन पिढी कशी घडेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे तसेच डॉक्टर संदीप सर्जेराव पाटील वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र आंबा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच ध्वज पूजन यंग जनरेशन सर्वांचे लाडके डॉक्टर रवींद्र रामनाथ काळे वैद्यकीय अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच सूत्रसंचालन श्री विलास दत्तू आळवेकर आरोग्य सहाय्यक यांनी केले यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र आंबा येथील सर्व कर्मचारी स्टाफ उपस्थित होते.


Vanchit News