Vanchit News

केंद्रप्रमुख मच्छिंद्र मोहिते यांच्या कल्पनेतून दुर्गमानवाड केंद्रांतर्गत बदली झालेल्या शिक्षकांचा सदिच्छा समारंभ.वंचित न्यूज चॅनल : सह संपादक:- श्रीरंग कांबळे. दिनांक:- 1/5/2023. राधानगरी :- केंद्र शाळा दुर्गमानवाड येथे शनिवार दिनांक 29/4/2023 रोजी बदली झालेल्या शिक्षकांचा सदिच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता.या समारंभाच्या निमित्ताने बदली झालेल्या सर्व शिक्षकांनी दुर्गमानवाड समुह साधन केंद्राला मौल्यवान व गरजेच्या वस्तू भेटवस्तू म्हणून दिल्या. दुर्गमानवाड केंद्राचे माजी केंद्रप्रमुख रंगराव बरगे यांनी 2500 रुपये किमतीची ऑफिस चेअर भेट दिली.सौ.सारिका प्रकाश पाटील यांनी 1500 रुपये किमतीचा टेबल फॅन भेट म्हणून दिला. संजय सदाशिव पाटील मानबेट, अमर बाबुराव कोरवी सोनारवाडी,सुभाष ज्योतीराम डवरी सोनारवाडी, युवराज केरबा पाटील पडसाळी,भिमराव भरमु शिट्याळकर पडसाळी,मिलिंद विठ्ठल तोडकर चौकेवाडी,प्रकाश पांडुरंग पाटील चौकेवाडी,संतोष माधववराव फड खोपेचा धनगरवाडा,रहिमतुल्ला चुन्नुमिया शेख केंद्रशाळा दुर्गमानवाड राहुल आत्माराम झिरमिरे कंदलगाव,दीपक राजाराम चव्हाण राई,विजय उत्तम कांबळे मानबेट या बदली झालेल्या सर्व शिक्षकांनी प्रत्येकी 550 रुपये किमतीच्या 14 प्लास्टिक खुर्च्या दुर्गमानवाड सीआरसीला भेट दिल्या.अशा सुमारे 12000 रुपयांच्या भेटवस्तू देऊन एक वेगळा आदर्श घालून दिला. केंद्रातील उर्वरित सर्व शिक्षक व केंद्रप्रमुख यांनी सर्वांचा सत्कार व स्नेहभोजनाची व्यवस्था केली. केंद्रप्रमुख मच्छिंद्र मोहिते, शिक्षक समिती तालुकाध्यक्ष श्री बळवंत पोवार, शिक्षक संघ तालुकाध्यक्ष संतोष भोसले , केंद्र मुख्याध्यापक पांडुरंग भोसले,दिलीप कुकडे, संजय भोपळे यांनी व उर्वरित सर्व शिक्षकांनी मनोगताद्वारे बदली झालेल्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.केंद्रातील सर्व शिक्षकांनी सहभाग घेऊन कार्यक्रम उत्साहात पार पाडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदा पाटील केंद्र शाळा दुर्गमानवाड यांनी केले.


Vanchit News