Vanchit News

पंढरीत छञपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त व्याख्यानाला तुफान गर्दी.(छञपती शिवाजी महाराज चौकात भगवे वादळ).वंचित न्यूज चॅनेल: (नवनवीन उपक्रम राबविण्यात विठ्ठल प्रतिष्ठान यशस्वी)-अभिजीत पाटील. पंढरपूर शहर प्रतिनिधी: दिपक वाघमारे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या संकल्पनेतून विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित दि.१४मे रोजी महाराष्ट्राचे प्रसिद्ध व्याख्याते प्रा.नितीन बानगुडे पाटील यांच्या व्याख्यानास पंढरपूर करांनी भरभरून प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पंढरपूरामध्ये छञपती शिवाजी महाराज चौकात हजारोंच्या संख्येने शिवशंभू प्रेमीसह लहान थोरांची व महिलांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. समाजापुढे तळागाळापर्यंत इतिहास पोचविले पाहिजे. त्यातूनच भावी पिढी घडून समाजात मुख्य शिखरांवर पोचेल. नागरिकांतून एकच चर्चा दिसून आली की श्री.विठ्ठल सह साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील हे सर्वांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून पंढरपूर शहर तालुक्यातील लोकांची जनजागृती करताना दिसतात.. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे मा. जिल्हाधिकारी गोकुळ मवारे, पंढरपूर मा.नगराध्यक्ष सुभाष भोसले, ठाकरे गटाचे नेते संजय घोडके, स्वेरीचे सचिव डाॅ.बी.पी.रोंगेसर, व्हाईस चेअरमन सौ.प्रेमलता रोंगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते हणमंत पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शुभांगी जाधव, चारुशीला कुलकर्णी, सुरेश सावंत, महादेव तळेकर, श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे संचालक मंडळासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विठ्ठल प्रतिष्ठानचे सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Vanchit News