Vanchit News

टाकळी कोलते येथे १०१ जणांचे रक्तदान , आ.नारायण कुंचे यांच्या हस्ते उद्घाटन



टाकळी कोलते येथे १०१ जणांचे रक्तदान , आ.नारायण कुंचे यांच्या हस्ते उद्घाटन सह संपादक :- श्रीरंग कांबळे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या वतीने उपक्रम * फुलंब्री :जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या अंतर्गत न्निमित्त महाराष्ट्रात विविध ठिकाणी रक्तदान शिबरिाचे आयेाजन केल्या जात आहे . याचाच एक भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर फुलंब्री तालुका सेवा समितीच्यावतीने १९ जानेवारी दरम्यान ३ ठिकाणी पिरबावडा, कोलते टाकळी,तळेगाव येथे रक्तदान शिबीराचे आयेाजन करण्यात आल्याची माहिती तालुका समितीच्या वतीने देण्यात आली. कोलते टाकळी येथे रक्तदान शिबीराचे मा. आमदार नारायण कुंचे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्रात सिकलसेल, अनेमिया, हिमोफिलीया, बल्ड कँसर, किडनी फेल्युअर पेशंट जास्त आढळतात. अशा रूग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते. त्या अनुशंगाने शासनाच्या रक्त पेढ्यांना संप्रादाय मार्फत रक्त बाटल्या देण्याची निश्चित करण्यात येते. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर तील फुलंब्री तालुक्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबाराचे आयेाजन करण्यात आले आहे.छत्रपती संभाजी नगर येथील MGM हॉस्पिटल चे ब्लड बँक यांच्या वतीने यामध्ये पिरबावडा जनसेवा हॉस्पिटल तर टाकळी कोलते बस स्टॅड शिबीराचे आयोजन करण्यात आले होत.तर तळेगाव येथील काळे हॉस्पिटल येथे डॉ. विपल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले होते. शिबीरात सामाजिक बांधीलकी समजून सर्व स्तरातील नागरिकांनी सहभाग नोंदवून रक्तदान करावे असे आवाहन फुलंब्री तालुका सेवा समिती संप्रदायाची वतीने करण्यात आले होते.यावेळी समस्थ गावकरी उपस्थित होते. सर्व आयोजन चांगले केल्याबद्दल कॅम्प प्रमुख सुनिल कोलते,दादाराव इधाटे यांनी सर्वांचे आभार‌ मानले






Vanchit News