Vanchit News

वाल्मिकी नगर, पाचगणी: बेकायदेशीर बांधकामावर तात्काळ कारवाईची मागणी; अन्यथा 26 जानेवारीपासून बेमुदत उपोषण – महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा इशारा



???? वंचित न्युज चैनल ???? वाल्मिकी नगर, पाचगणी: बेकायदेशीर बांधकामावर तात्काळ कारवाईची मागणी; अन्यथा 26 जानेवारीपासून बेमुदत उपोषण – महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा इशारा सातारा जिल्हा प्रतिनिधी :- यतीन गोळे तारीख :- 26/1/25 पाचगणी :- वाल्मिकी नगर पाचगणी येथील प्लॉट नंबर 15 वरील बेकायदेशीर व अनधिकृत बांधकामावर फौजदारी गुन्हा दाखल करून ,तात्काळ बांधकाम जमीनदोस्त करा . अन्यथा 26 जानेवारी पासून बेमुदत उपोषण सुरू करणार महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गेल्या पंधरा दिवसांपासून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षातर्फे पाचगणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांना याच विषयावर तीन निवेदने आणि त्यांच्या दालनासमोर 16 जानेवारी रोजी आंदोलन करून सुद्धा पाचगणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी जाधव यांनी यावर कोणतेच कारवाई केली नाही. आंदोलन सुरू असताना स्वतःच्या गाडीत बसून निघून गेले . तरीही आता महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षातर्फे सातारा उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन वाल्मिकी नगर येथे प्लॉट नंबर पंधरा वर वाल्मिकी नगर सोसायटीचे सेक्रेटरी रोहित मोरे यांच्याकडून सुरू विनापरवाना व बेकायदेशीर बांधकामावर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांनी केलेल्या अतिक्रमण जमीनदोस्त करा . पाचगणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांना तीन-तीन निवेदने देऊन सुद्धा आपले कार्य करण्यास असक्षम का आहेत याची देखील सखोल चौकशी करा अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षातर्फे देण्यात आले सदर विषयावर 72 तासात कोणतेही कारवाई न झाल्यास 26 जानेवारी पासून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षातर्फे बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार आहे असा इशारा देखील प्रशासनाला देण्यात आला यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे वाई विधानसभा अध्यक्ष प्रणित मोरे स्वतः उपस्थित होत






Vanchit News