माढ्यातील क्रिडागण मैदानाची आमदार पाटील यांची अधिकाऱ्यांसोबत केली पाहणी)*

*आमदार अभिजीत पाटील यांनी दिलेला शब्द पाळला दर सोमवारी भरवला जनता संवाद* *(माढा शहरातील जिल्हा परिषद शाळेला सदिच्छा भेट)* *(माढ्यातील क्रिडागण मैदानाची आमदार पाटील यांची अधिकाऱ्यांसोबत केली पाहणी)* वंचित न्यूज चैनल माढा तालुका प्रतिनिधी/- अमोल जाधव माढा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये आमदार अभिजीत आबा पाटील यांनी सभेमध्ये मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता संवाद भरवणार असल्याचा शब्द दिला होता. त्यांनी पाळला तो शब्द खरा करत दि.२७ जानेवारी दिवशी नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये जनतेचे प्रश्न, तक्रारी व निवेदन सोडविण्यात आले. इथून पुढेही दर सोमवारी आमदार अभिजीत आबा पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय, ग्रामीण रुग्णालय समोर, माढा येथे जनता संवादाच्या माध्यमातून मतदार संघातील जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, मतदार संघातील प्रत्येक नागरिकांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेऊन त्यांचे निवारण केले आहेत.