Vanchit News

रुकडी येते बाल युवक श्रामनेर शिबिरस उत्स्फूर्त प्रतिसाद



वंचित न्यूज चैनल सह संपादक:- श्रीरंग कांबळे दिनांक :- 30/5/23 रूकडी/ हातकणंगले - मुलांना बौद्ध संस्कार अनुसरणासाठी मुलांना शीलवान गुणवान प्रज्ञावान अंधश्रद्धा मुक्त बुद्धीवादी विवेक वादी विज्ञानवादी समताधिष्ठित यशस्वी आदर्श नागरिक बनवण्यासाठी बाल श्रमनेर शिबिराचे आयोजन रुकडी तालुका हातकणंगले येथे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा कोल्हापूर व हातकणंगले तालुका भारतीय बौद्ध महासभा ग्रामीण शाखा रुकडी व समस्त बौद्ध समाज रूकडी यांचे वतीने करण्यात आले या शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक संघनायक पूज्य भंते भदंत धम्मप्रिय जी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले डॉ बाबासाहेब आंबेडकर संस्थांतर्गत 24 प्रकारच्या विविध शिबिरांचे आयोजन केले जाते त्यातील 5 दिवसीय बाल युवक श्रामनेर शिबिर रुकडी येथे आयोजित करण्यात आले या शिबिरास जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून 74 मुलांनी सहभाग नोंदवला असून मुलांना धम्म विषयी आणि संस्कार विषयी पूज्य भदंत धम्मप्रियजी हे मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत शिबिरास रुकडी गावातील समस्त बौद्ध समाज व अनेक दान दात्यांनी विविध प्रकारे योगदान देत शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचा वाटा उचलला आहे दरम्यान या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व समता सैनिक दलाचे मेजर आदरणीय आयुष्यमान एस पी दीक्षित सर जिल्हा सरचिटणीस आयु अरविंद कांबळे सर जिल्हा कोषाध्यक्ष आयु गोविंद कांबळे सर हातकणंगले तालुका अध्यक्ष आयु राजेंद्र भोसले सर तालुका सरचिटणीस प्रभाकर कांबळे रुकडी बौद्ध समाजाचे अध्यक्ष अतिश शिंगे यांच्यासह पदाधिकारी सर्व सदस्य उपासक तसेच उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते






Vanchit News