Vanchit News

*प्रेम तु खूप मोठा हो,हा मामा सदैव तुझ्या पाठीशी आहे...* *माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून विद्यार्थ्यावर कौतुकाची थाप....*वंचित न्यूज चैनल उपसंपादक :सतीश जगताप दि.०६/०६/२०२३ डाळज नं.२ येथील प्रेम प्रदिप सोन्ने या विद्यार्थ्याने १० वी च्या परिक्षेत तब्बल ९८℅ मार्क्स मिळवत घवघवशीत यश संपादन केले आहे.त्याच्या या यशाबद्दल आज माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रेम सोन्ने याची भेट घेत अभिनंदन केले आहे. प्रेम सोन्ने या विद्यार्थ्याची कौटुंबिक परस्थिती अत्यंत हालाखीची असून तो डाळज येथील न्यु इंग्लिश स्कुल येथे शिक्षण घेत आहे.त्याचे आई-वडिल मोल-मजुरी करून उदरनिर्वाह करत आहेत.अशा हालाखीच्या परिस्थितीमध्ये प्रेम ने तब्बल ९८℅ मार्क्स मिळवले असुन तालुक्यात प्रथम क्रमांक पटकवला असुन पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये सुद्धा त्याने पहिला येण्याचा बहुमान पटकविला आहे. या निमित्ताने प्रेमचे अभिनंदन करत असताना आमदार भरणे म्हणाले की,दोन वेळच्या जेवनाची भ्रांत असणा-या कुटूंबातील विद्यार्थ्याने परस्थितीशी संघर्ष करत कोणतीही शिकवणी न लावता स्वत: अभ्यास करून १० वी च्या परिक्षेत मिळवलेले यश हे इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितपणे प्रेरणादायी असून आपल्या सर्वांना प्रेमचा अभिमान आहे.त्याच्या या यशामध्ये आईवडील,भाऊ-बहिण तसेच शिक्षकांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगत आमदार भरणे पुढे म्हणाले की,इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रेम सोन्ने या आदर्श घ्यावा.त्याच बरोबर आमदार भरणे यांच्याशी हितगुज करत असताना प्रेमने भविष्यात प्रशासकीय सेवेत जाण्याचा मनोदय व्यक्त केला असता श्री.भरणे यांनी सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.यावेळी जेष्ठ नेते प्रतापराव पाटील,सचिन सपकळ,नंदकुमार पानसरे यांच्यासह सोन्ने कुटूंबीय उपस्थित होते.


Vanchit News