अक्षय भालेराव च्या खुन्यांना फाशी झालीच पाहिजे आंबेडकरी चळवळीतील राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांची मागणीम

वंचित न्यूज चॅनेल पाटण तालुका प्रतिनिधी हणमंत कांबळे. दि.१४. नांदेड येथील युवक अक्षय भालेराव या दलीत युवकाची गावातीलच काही गावगुंडांनी हत्या केली.मुंबई येथील सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहतील हिना मेश्राम या युवतीवर अत्याचार करून खून करण्यात आला.या दोन्ही घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले या दोन्ही घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या असून समस्त आंबेडकरी बहुजन समाजामध्ये या दोन्ही घटनेमुळे असंतोषाचे वतावरण तयार झाले असून या घटनेचा संपुर्ण महाराष्ट्रभर निषेध व्यक्त करत आहेत.अक्षय भालेराव यांच्या खुन्यांना फाशीची शिक्षा व्हावी व काठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी पाटण तालुक्यातील सर्व बहुजन आंबेडकरी चळवळीतील संघटना व राजकीय पक्षांनी निषेध मोर्चा काढण्यात आला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक म्हवशी पाटण येथून बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाची शतातेत सुरुवात झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अक्षय भालेराव यांच्या खुन्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराज की जय हिना मेश्राम ला न्याय मिळालाच पाहिजे.मनुवादी सरकारचा निषेध अासो.हातात निळे झेंडे घेऊन भीमसैनिक जुना पाटण एस टी स्टँड झेंडा चौक लयाब्री चौक मार्गे मोर्चा तहसील कार्यालय पाटण येथे धडकला तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.निषेध मोर्चा चे नंतर सभेत रूपांतर झाले. यावेळी उपस्थित प्रा.रवींद्र सोनावले सचिन कांबळे बबन कांबळे भानुदास सावंत रेखा जाधव यांची भाषणे झाली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून जातीयवादी गावगुंडांनी अक्षय भालेराव या युवकाचा खून करण्यात आला.या जातीयवादी आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.अक्षय भालेराव यांच्या कुटुंबाला शासनाकडून ५०लाख रुपयांची मदत देण्यात यावी कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी देण्यात यावी अशा मागण्या करत निषेध व्यक्त करण्यात आला.या मोर्चात वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन सेना आर.पी. आय.आठवले गट भा.बौद्ध महासभा बहुजन क्रांती मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्त्सव समती बहुजन क्रांती दल.समता सैनिक दल ई.संघटना पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. तालुक्यातील विशेषतः हेळ वाक विभाग मोरणा विभाग केरा विभाग अशा तालुक्यातील आठही विभागातील महिला युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते