Vanchit News

अंतरराष्ट्रिय योगा दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमीक शाळा कुरणवाडि (शेवरे) येथे प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.आज दिनांक 21/6/2023 रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमीक शाळा कुरणवाडि शेवरे तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे इयत्ता 1 लि मध्ये दाखल झालेल्या सर्व मुलांचे स्वागत समारंभ साजरा करण्यात आला. प्रसंगी इयत्ता 1लि मध्ये दाखल झालेल्या सर्व मुलांना फेटे बांधण्यात आले.त्यांचे औक्षण करण्यात आले .वस्तीवरील पहिल्या घरापासून ते शेवटच्या घरापर्यंत मुलांचि ट्रॅक्टर मध्ये बसवून हालग्या वाजवून भव्यदिव्य अशि मिरवणुक काढण्यात आलि .आदल्या,फटाकड्या वाजवण्यात आल्या . लहाण मुलांना शाळेचि आपुलकी वाटावी आनंदी वातावरणात मुलांच्या जीवनातील एका नव्या आयुष्याची सुरवात व्हवि सर्व पालकांना सुद्धा शाळेविषयि जिव्हाळा वाटावा इत्यादी असे मत शाळेचे मुख्याध्यापक श्रि सोमनाथ गव्हाणे सर यांनी व्यक्त केले.विद्यार्थी हा शाळेचा आत्मा आहे त्यांचे स्वागत आनंदात झाले.असे मत शाळेतिल सह शिक्षक श्री बाबासाहेब गायकवाड यांनी व्यक्त केले. शेवटी आजचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे वस्तीवरील सर्व पालक ,शाळा व्यवस्थापन समिती यांचे आभार शाळेच्या वतिने श्री बाबासाहेब गायकवाड यांनी मानले .या प्रसंगी श्री संजय मोरे,दत्तात्रय नगरे,गणेश मस्के,गणेश काळे,अमोल जाधव,गणेश मस्के,ज्ञानेश्वर मोरे ,भारत चमरे,दत्तात्रय जाधव,हणुमंत बनसोडे,अमोल मस्के,उमेश वाघमारे ,संतोष मिसाळ ,सागर चव्हाण,आण्णा मस्के,इत्यादी सर्व पालक ग्रामस्थ तसेच महिला अंगणवाडी सेविका सत्यभामा कांबळे मदतनिस महानंदा काळे ,पुष्पा कुलकर्णी,प्रियंका कुलकर्णी,रेणुका कुलकर्णी,पुजा जाधव,वणिता जाधव,सखु मस्के,सुजाता नगरे,राजाबाई बनसोडे,तसेच इतर महिलांचा सुद्धा लक्षणीय सहभाग होता.


Vanchit News