
( भारतीय बौद्ध महासभा आजरा तालुका शाखेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन ) सह संपादक:- श्रीरंग कांबळे तारीख:- 22/6/23 कोल्हापूर/आजरा:- . नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव यांच्यावर प्राण घातक हल्ला केल्याबद्दल भारतीय बौद्ध महासभा आजरा शाखेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी अक्षयच्या मारेकऱ्यावर जास्तीत जास्त कडक कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे अक्षय भालेराव यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्या संदर्भात संबंधितावर कारवाई व्हावी अशी निवेदन आजरा तहसीलदारांना देण्यात आले आहे यावेळी भारतीय बौद्ध महासभा आजरा तालुका शाखेचे अध्यक्ष शिवाजी सम्राट, केरबा कांबळे, भिकाजी कांबळे सर, परशु कांबळे, उत्तम कांबळे, सुरेश कांबळे, आनंद कांबळे, प्रकाश कांबळे, मारुती कांबळे, अशोक कांबळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते