Vanchit News

*इंदापूर तालुक्यात आमदार दत्तात्रय भरणे यांची तातडीची बैठक, प्रशासकिय आधिकारी उपस्थितवंचित न्यूज चैनल उपसंपादक: सतीश जगताप दि.०६/०७/२०२३ इंदापूर तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांची तालुकास्तरीय आढाव बैठक इंदापूर पंचायत समिती सभागृह येथे सकाळी 11 वाजता होणार असून या बैठकीस इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.या बैठकीस इंदापूर तालुक्यातील सर्व विभागाच्या विभाग प्रमुखाला बैठकीस माहिती घेऊन बोलवले आहे या बैठकीमध्ये तहसीलदार ,गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी नगरपालिका तसेच पोलीस अधिकारी ,कृषी अधिकारी, वनअधिकारी, जलसंपदा अधिकारी ,बांधकाम विभागाचे अधिकारी ,पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, महावितरण अधिकारी ,महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी ,समाज कल्याण विभागाचे अधिकारी ,शिक्षण विभागाचे अधिकारी ,आरोग्य विभागाचे अधिकारी असे सर्व विभाग प्रमुखांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले असून आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न होणार आहे अशी माहिती श्रीकांत पाटील यांनी दिली आहे


Vanchit News