निरा नरसिंहपूर मधील कु.संघमित्रा मच्छिंद्र सरवदे यांनी केले वडिलांचे स्वप्न साकार केले

वंचित न्यूज उपसंपादक: सतीश जगताप निरा नरसिंह पूर मधील कन्या कु.संघमित्रा मच्छिंद्र सरवदे ह्या मुलीने केले वडिलांचे स्वप्न साकार, प्राथमिक शिक्षण नीरा नरसिंहपुर या ठिकाणी केले व दहावीपर्यंत शिक्षण हे चैतन्य विद्यालय नीरा नरसिंहपुर या ठिकाणी पूर्ण करून ,अकरावी बारावीचे शिक्षण शिवाजी विद्यालय बावडा या ठिकाणी पूर्ण केले. घरची परिस्थिती अ तिशय हालाखीची असल्यामुळें पुढील शिक्षण न करता आयटीआय इलेक्ट्रॉनिक्स हा कोर्स करून पुण्यामध्ये खाजगी कंपनीमध्ये नोकरी केली, खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत असतानाच फायनान्स मॅनेजमेंट या विषयातून एम .बी .एचे शिक्षण पूर्ण केले, पुढे लॉकडाऊनच्या काळामध्ये निरा नरसिंहपुर या ठिकाणी आल्यानंतर वडिलांनी आई जवळ आपल्या मुलीने वकिलीचे शिक्षण करावे अशी इच्छा व्यक्त केली, म्हणूनच मी वकील या क्षेत्रामध्ये जाण्याचे ठरविले व प्रत्येक वर्षाला फर्स्ट क्लास मध्ये मार्क्स मिळवून आज वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. समाजातील गोरगरीब लोकांना न्याय देण्याचे कार्य आपण भविष्यामध्ये करणार आहोत अशा प्रकारचे वंचित न्यूजशी बोलताना त्यांनी सांगितलें. या होतकरू मुलीची चर्चा सर्व परिसरामध्ये होत आहे