Vanchit News

*लासूर्णे येथील मुस्लिम कार्यकर्त्यांचा आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश.*वंचित न्यूज चॅनल. उपसंपादक, सतीश जगताप दि.05/07/2023 फसवणूक करून आमचा भाजपाप्रवेश घेतला,लासुर्णे येथील मुस्लिम समाजाचा भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांवर गंभीर आरोप* *मरेपर्यंत भरणे मामांचा पाईक म्हणून काम करणार असल्याची * मुस्लिम बांधवांकडून ग्वाही.. भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिशाभूल व फसवणूक करून आमचा भाजपात प्रवेश करवून घेतला होता.मात्र आम्ही सर्व मुस्लिम बांधव इंदापूरचे भाग्यविधाते दत्तात्रय भरणे यांच्या सोबतच असून मरेपर्यंत आमदार भरणे मामांचे पाईक म्हणून काम करणार असल्याची स्पष्टोक्ती लासुर्णे येथील शेकडो मुस्लिम बांधवांनी दिली आहे. याचे झाले असे की,अवघ्या काही दिवसांपूर्वीच जुलैखान मुलाणी, वलेखान मुलाणी,अकबर शेख,जावेद मुलाणी,बशीरभाई शेख आदी कार्यकर्त्यांचा नुकताच भाजपात प्रवेश झाला होता.या प्रवेश समारंभास आठवडाही ऊलटत नाही तोच आज लासुर्णे येथील मुस्लिम जमात ट्रस्टी वलेखान मुलाणी,जुलेखान मुलाणी,अजीज मुलाणी, शाहनुर मुलाणी,फारुख मुलाणी, इरफान मुलाणी अरबाज मुलाणी,निजाम भाई कुरेशी,हजी हुसेन कुरेशी,गनिभाई कुरेशी,हमीद मुलाणी,जमीर मुलाणी,सादिक शेख,खाजाभाई शेख,हसन शेख ,असिफ मुलाणी,लतिफ मुलाणी,समशेर मुलाणी,सादिक शेख ,जावेद मुलाणी, सहबाज शेख,अरबाज शेख,रमजान शेख,हुसेन मुलाणी,राजू मुलाणी, अस्लम मुलाणी,मुबारक मुलाणी,अकबर शेख, महम्मद मुलाणी,शब्बीर मुलाणी,इरफान कुरेशी,इम्रान कुरेशी,यासीन बागवान,समीर मुलाणी,अमीर मुलाणी,फिरोज सय्यद ( माजी उपसरपंच जंक्शन) नजरुद्दीन महत, फैजुद्दिन सय्यद, अमीर महत, डॉ. तांबोळी, असिफ तांबोळी,जाफर तांबोळी, सुरज सय्यद, समीर शेख,तकेमिया शेख यांच्यासह शेकडो मुस्लिम बांधवांनी आज आमदार दत्तात्रय भरणे यांची भेट घेत घडलेल्या प्रकाराची हकिकत कथन केली. या विषयी बोलताना जुलैखान मुलाणी व वलेखान मुलाणी यांनी सांगितलं की,आमची फसवणूक करून आम्हाला इंदापूर येथे बोलवण्यात आले होते.व काही कळायच्या आत आमचा भाजपात प्रवेश करवून घेत लागलीच आमच्या भाजपाप्रवेशाच्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या होत्या.मात्र यामध्ये काहीही तथ्य नसुन लासुर्णे येथील आम्ही सर्व मुस्लिम बांधव भरणे मामांच्या खंबीर नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच काम करत आहोत,याविषयी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये,अशी ग्वाही सर्वांनी आमदार दत्तात्रय भरणे यांना दिली. तसेच पुढे बोलताना मुस्लिम बांधवांनी सांगितले की,खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्षता,सामाजिक समता आणि बंधुभाव जपणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असुन आम्ही आम्ही सर्व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी सर्वांचे स्वागत करून निधीच्या बाबतीत मुस्लिम समाज्याला लागेल तेवढा निधी देण्याचा शब्द दिला.यावेळी छत्रपती कारखान्याचे व्हा.चेअरमन अमोल पाटील,सरपंच सागर पाटील,डॉ.योगेश पाटील,राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष इक्बाल शेख,मुस्लिम समाजाचे जेष्ठ नेते शब्बीर काझी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


Vanchit News