Vanchit News

शेळ्या व बोकड चोरीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना, व दोन विधी संघर्ष बालकांना, इंदापूर पोलिसांनी जेरबंद करून त्यांचे चोरीचे सतरा गून्हे केले उघडवंचित न्यूज चैनल उपसंपादक ,सतीश जगताप दि.08/08/2023 इंदापूर पोलीस स्टेशन अंकित बावडा दूरक्षेत्र हद्दीतील निमगाव केतकी सरडेवाडी या परिसरातील शेतकऱ्यांचे शेळ्या व बोकड चोरीचे वाढते प्रमाणाच्या अनुषंगाने इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय दिलीप पवार यांनी बावडा पोलीस दुरक्षेत्र तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील सहाय्यक फौजदार शिंदे पोलीस नाईक गायकवाड ,पोलीस आमदार विनोद लोखंडे ,पोलीस अंमलदार आरिफ सय्यद, विक्रम जमादार, यांना बोलवून चोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत सूचना दिल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व बावडा तपास पथकाने प्राप्त माहितीच्या आधारे 1) मेजर उर्फ सोमनाथ सिताराम मोरे 2).... पॉयझन उर्फ प्रथमेश भोसले दोन्ही राहणार रेडा तालुका इंदापूर जिल्हा 3 )निलेश बाबासाहेब सरवदे रा. का टी ,तालुका इंदापूर जिल्हा पुणे व दोन विधी संघर्ष बालक यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी 17 ठिकाणी शेळ्या व बोकड चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले , सन 2022 ते 2023 या वर्षात त्यांनी हे गुन्हे केल्याचे कबूल केले त्यांचे वरती ३७९ अंतर्गत 17 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. सदर कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल, सो, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे सो, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, माननीय पोलीस निरीक्षक दिलीप पवार ,यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक के बी शिंदे ,पोलीस हवालदार जाधव, पोलीस नाईक कदम ,पोलीस नाईक पोलीस नाईक गायकवाड ,पोलीस नाईक कळसाईत, हेगडे, पोलीस अमलदार अकबर शेख, विक्रम जमादार, गणेश डेरे ,विनोद लोखंडे, नंदू जाधव, आरिफ सय्यद यांनी केली


Vanchit News