Vanchit News

पाटण तालुक्यातील कोयना नदीवरील नेरळे गौंड येथील जुना पुल पाडून नवीन पुल बांधण्यासाठी सर्वपक्षीय रास्ता रोकोवंचित न्यूज चैनल पाटण तालुकाप्रतनिधी: हनमंत कांबळे . दि.११/०८/२०२३ वंचित न्यूज चॅनेल पाटण तालुका प्रतनिधी हणमंत कांबळे मोराणा विभागातील नेरळे गौंड ते मोरागिरी हा रस्ता गेले अनेक वर्षे हा पूर्णपणे नादुरुस्त असून छोटे मोठे खड्डे या रस्त्यामध्ये पडलेले आहेत रोज दिवसाला या रस्त्यावरून हजारो वाहने ये जा करत असतात त्यामध्ये या रस्त्यामध्ये अशी अवस्था आहे की रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रास्ता आहे अशी अवस्था या रस्त्याची झालेली आहे.आणि शासन या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे.मोरणं विभागाला जोडणारा नेरळे गौं ड कोयना नदीवरील हा पूर्णपणे नादुरुस्त असून पुलाची अवस्था त्यावरील लोखंडी पट्ट्या असतील नाहीतर लोखंडी रॉड असतील पूर्णपणे नादुरुस्त असून उघडे पडलेले आहेत.या पुलावरून हजारो अवजड वाहने ये जा करत असतात त्यामध्ये प्रामुख्याने शाळकरी विद्यार्थी नोकरदार महिला पुरुष तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त ये जा करत असतात तरीच शासनाने एखादी दुर्घटना होऊ नये यासाठी लोकांची समस्या लक्षात घेऊन या ठिकाणी नवीन सुसज्ज असा पुल बांधण्यात यावा यासाठी मोरना विभागातील सर्व पक्षीय रास्ता रोको आंदोलन नेरळे या ठिकाणी करण्यात आले.सुमारे दीड ते दोन तास वाहतुकीचा खोळंबा झाला. विविध सामाजिक राजकीय शै क्षणिक क्षेत्रातील लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रास्ता रोको केला आंदोलन स्थळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष गोरख नारकर शंकरराव मोरे . शिवसेना पाटण तालुका अध्यक्ष उद्धव ठाकरे गट सुरेश पाटील.रिपब्लिकन सेना पाटण तालुका अध्यक्ष सचिन कांबळे संजय पाटील रंगराव जाधव निवास पाटील सामाजिक कार्यकर्ते जयवंत सुर्वे विद्या म्हासुरणेकर यांनी आपली परखड मते व्यक्त केली.


Vanchit News