चंदगड येथे रानभाजी महोत्सव संपन्न

सह संपादक:- श्रीरंग कांबळे तारीख:- 19/8/23 चंदगड /कोल्हापूर महाराष्ट्र शासन तालुका कृषी अधिकारी चंदगड यांचे मार्फत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय चंदगड येथे रानभाजी महोत्सव यशस्वीपणे संपन्न झाला. मंडळ कृषी अधिकारी कोवाडचे अनिकेत माने यांनी रानभाज्यांची ओळख करून दिली व रानभाज्यांचे आहारातील महत्व समजून सांगितले.सध्याच्या जीवनात रानभाज्यांचे आहारातील प्रमाण कमी झाले असून त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत.रोजच्या आहारात रानभाजीचा समावेश असावा.त्यामुळे येणारी पिढी ही निरोगी जन्माला येईल, आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य निरोगी व तंदुरुस्त राहील.या बाबत माहिती दिली. तालुका कृषि अधिकारी विजय गंबरे यांनी रानभाजी महोत्सव बाबत माहिती दिली.यामध्ये बाजारपेठेत गुळवेल व इतर रानभाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे.शेतकऱ्यांनी रानभाज्यांची लागवड करावी यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन निर्माण होईल.या बाबत शेतकऱ्यांना अवगत करण्यात आले. संतोष कुठवड कृषि पर्यवेक्षक यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती रत्नमाला वाडेकर कृषी सहाय्यक यांनी रानभाजीचे उपयोगी गुणधर्म ,महत्व व पौष्टीक तृन्यधान्य बाबत माहिती. व आभार प्रदर्शन केले. यावेळी रानभाजीचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते.या कार्यक्रमास श्री.अभिजीत दावणे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक,मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक,कृषि सहाय्यक,शेतकरी उपस्थित होते