Vanchit News

* रामलिंग फाटयावरील अपघातात तीन जागीच ठार*सहसंपादक:- श्रीरंग कांबळे तारीख:- 21/8/23 हातकणगले / हातकणंगले कोल्हापूर रोडवर हातकंणगले नजिक असलेल्या रामलिंग फाट्याव एस.टी. नंबर एम. एच.१४ बी.टी. २५०९ व रिक्षा नंबर एम.एच ०९ जे ८९८९ याची धडक होवून जागेवर दोन व हॉस्पीटल मध्ये एक असे एकूण तीन जण ठार झाले. घटनास्थळावरून व पोलीस ठाण्यातून मिळालेली माहीती अशी की रिक्षा ड्रायव्हर प्रशांत पेटकर रा. इचलकंरजी आपली रिक्षा घेवून कोल्हापूर हातकंणगले मार्ग ओलाडून रामलिंगकडे जात होता दरम्यान कुडाळ एस.टी.डेपोची गाडी घेवून ड्रायवर रविद्र प्रभाकर चव्हाण रा. पंढरपूर हा सोलापूर कडे जात होता एस.टी.वेग इतका होती कि अपघात स्थळाच्या ठिकाणच्या मागे तो पन्नास फूट बेक् लावून येत होता आणि अपघात झाले नंतर सदर रिक्षा जवळ पास ७० ते ८० फूट घसटत नेली अपघाताच्या ठिकाणचे भयानक चित्र होते. रिक्षा ड्रायव्हरचे दोन्ही पाय जागेवर तुटले तर मागे बसणारी महिला शिवानी घेवर खत्री वय ३५ रा. इचलकंरजी व त्याच्या सोबत असणारा दहा वर्षाचा मुलगा हे दोघे जागे वरच मरण पावले तर रिक्षात अन्य दोघेजण मागे बसले होते त्यांना कोल्हापूर सी.पी.आर.हॉस्पिटलमध्ये येथे नेत असताना एकाचा मूत्यू झाला आहे. पोलीसांनी एस.टी व चालकाला ताब्यात घेतले आहे.अधिक तपास प्रशिक्षणार्थी पोलीस अधिक्षक रविंद्र भोसले करीत आहेत ( इतर नावे अद्याप मिळाली नाहीत )


Vanchit News