Vanchit News

कुसरूंड वि. का.स.सो.ची वार्षिक सभा चेरमन अधिक भाऊ शिंदे यांचे अध्यक्षतेखाली संपन्नवंचित न्यूज चॅनेल पाटण तालुका प्रतिनिधी हणमंत कांबळे दी.12/09/2023 कुसरुंड विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची वार्षिक सर्व साधारण सभा प्राथमिक जिल्हा परिषद शाळा कुसरूंड या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली नव्यानेच निर्माण झालेली ही संस्था सभासद व हितचिंतक संस्थेचे नवनिर्वाचित चैरमन तंटामुक्ती अध्यक्ष मा.अधिकभाऊ प्रभाकर शिंदे यांचे मागदर्शनाखाली जोमाने वाटचाल सुरू आहे. संस्थेचे सचिव तानाजी शिंदे यांनी संस्थेने अल्पावधीतच केलेली प्रगती या विषयी माहिती दिली.यावेळी व्हाइस चैरमन नथुराम पवार, संचालक पत्रकार हणमंत नानासो कांबळे, ज्ञानदेव चंद्रू शिंदे, खाशाबा केशव पवार, यशवंत शिंदे सभासद हितचिंतक रिपब्लिकन सेना पाटण तालुका अध्यक्ष मा.सचिन कांबळे, नाटोशी वी.का. स.सेवा.सोसायटी चे सचिव विकास जाधव उपस्थित होते होते.शेवटी संस्थेचे चेरमंन यांनी संस्थेमध्ये अधिक अधिक कर्ज काढून कर्जे वेळेवर भरून संस्थेस सहकार्य करावे व संस्थेच्या प्रगतीस हातभार लावावा.शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात शेअर्स खरेदी करावेत असे आवाहन चेरमन यांनी केले आभार मानून सभेची सांगता झाली.


Vanchit News