Vanchit News

***धम्मागिरी विहार गिरालगाव ता. भूम जि. धाराशिव येथे वर्ष वासानिमित्ता धम्म गिरी सम्यक गौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला.****रविवार दि.८,ऑक्टोबर गिरलगाव ता भूम जि धाराशिव येथे वर्षावासनिमित्त *धम्मगिरी सम्यक गौरव पुरस्कार वितरण* सोहळा संपन्न झाला धम्म कार्यातील व सामाजिक उत्कृष्ट योगदानाबद्दल दरवर्षी हा राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. या कार्यक्रमाचे हे तिसरे वर्षे आहे. या वर्षी भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षआयु.सुनिल एकनाथ चांदणे(पत्रकार) कुर्डुवाडी यांना वाशी पोलीस निरीक्षक दसुरकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला यावेळी पुज्य भन्ते गुणरत्न महाथेरो नंदुरबार, , योगीराज वाघमारे जेष्ठ साहित्यिक, डॉ सारिपुत्त तुपेरे, केंद्रीय शिक्षिका शारदाताई गजभिये, बौद्धाचार्य गोकुळ गायकवाड गुरुजी विनायक म्हस्के सर , निखिल घायतडक नगराध्यक्ष जामखेड, मआदिनाथ घुले पुणे, रविन्द्र घुले तालुका कृषी अधिकारी भूम, प्रविण दादा रणबागुल वंचित आघाडी चे मराठवाडा अध्यक्ष.मा.बिभिषण वाघमोडे उपसरपंच गिरलगाव, सचिन डोंगरे पोलिस पाटील गिरलगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान चिन्ह, मानाचा फेटा, ग्रंथ, पंचशील पट्टी आणि बुके देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्हा सरचिटणीस डॉ.अशोक ओहळ, माढा तालुका अध्यक्ष अण्णाराव खंडागळे, कोषाध्यक्ष सोमनाथ चांदणे, मेजर सौदागर वाघमारे, मेजर आठवले, RPI मा.शहर अधक्ष नितीन कांबळे, पप्पू मुलाणी इत्यादी उपस्थित होते भारतीय बौद्ध महासभा जिल्हा व तालुका यांच्या वतीने धार्मिक सामाजिक कार्यबद्दल गुणगौरव व अभिनंदन सर्व स्तरामधून होत आहे


Vanchit News