Vanchit News

लेझिम खेळताना तरूनाचा मृत्युकोकण विभाग प्रमुख:- सखारामजी कांबळे तारीख:- 25/10/23 आंबा:- शाहूवाडी पैकी आंबा येथील ग्रामदैवताच्या जागरणाचा सोहळा रंगला असताना तरुण लेझीम नृत्याच्या तालावर मंदिर प्रदक्षिणा घालत होते तेव्हा लेझीम खेळात दंग असणाऱ्या राजाराम पाटील यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते जमिनीवर कोसळली त्यांना तातडीने दवाखान्यात हलवले पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला रविवारी मध्यरात्री ही घटना घडली राजाराम पांडुरंग पाटील( वय 45 ) हे आंबा येथील श्री आंबेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक होते ते आंबा जंगल सफारीचा व्यवसाय करीत होते गावच्या सार्वजनिक कार्यात नेहमीच पुढाकार घेत होते लेझीम खेळताना दम लागल्यामुळे राजाराम पाटील यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला अशा उमद्या नेतृत्वाला त्यांच्या जाण्याने गाव पोरका झाल्यासारखा लोकातुन चर्चा होत आहे व त्यांच्या जाण्याने राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात त्यांची उणीव कायम बसणार असे गाव पातळीवर चर्चा होत आहे त्यांच्या पश्चात त्यांचे आई पत्नी दोन मुले असा परिवार आहे


Vanchit News