Vanchit News

*पत्रकार संरक्षण समिती सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनील चांदणे यांनी राहुल भालशंकर यांची बार्शी तालुकाध्यक्षपदी केली निवड .**वंचित न्यूज चैनल* *माढा तालुका प्रतिनिधी :अमोल जाधव* बार्शी तालुका अध्यक्षपदी राहुल लक्ष्मण भालशंकर तेजस न्यूज चैनलचे संपादक यांचे निवड करण्यात आली. जिल्हा अध्यक्ष सुनील चांदणे यांनी नियुक्तीपत्र देऊन निवड जाहीर केली. यावेळी तालुका अध्यक्ष भालशंकर म्हणाले की, मी गेल्या सात वर्षापासून पत्रकारीता मध्ये कार्यरत असून तेजस न्यूज 567 चा संपादक आहे. सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रामध्ये मागील दहा वर्षापासून कार्यरत असून बार्शी तालुक्यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. माझ्यावर तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली ती प्रामाणिक पणे पत्रकाराच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासन दिले यावेळी भिम टायगर संस्थेचे अध्यक्ष शंकर वाघमारे, नागनाथ सोनवणे सर, ऋषिकेश बोकेफोडे वकील, अनिकेत गाडे, नागनाथ सोनवणे सर हे उपस्थित होते सर्वांनी नूतन तालुका अध्यक्ष यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या


Vanchit News