Vanchit News

पँथरचा दणकावंचित न्यूज चॅनल :- कोल्हापूर प्रतिनिधी :- मिलिंद सामुद्रे दि.24-08-2022 नॅशनल ब्लॅक पँथर राष्ट्रीय अध्यक्षा सूवर्णाताई थोरात यांच्या अध्यक्षतेखाली दि.19-08-2022 रोजी पंचायत समिती कार्यालय हातकलंगले ऑफिस यांना अंबप मधील आंबेडकर नगर मधील घाणीचे साम्राज्य व आंबेडकर नगर मधील पाणी पुरवठा कित्तेक महिने बंद केला होता या साठीचे निवेदन नॅशनल ब्लॅक पँथर पार्टीच्या वतीने देण्यात आले होते.घाणीमुळे गावठी कुत्री मोठ्या प्रमाणात वावरत होती.काही लहान मुलांच्या वर जीवघेणी हल्ला केलेला आहे.असे ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांच्या निदर्शनास आणून देऊन ही कोणतीही कार्यवाही केली नाही.प्रशासनाने जाणून भूजून दुर्लक्ष केले.यावर नॅशनल ब्लॅक पँथर च्या शिष्ट मंडळाने पँथर स्टाईल ने दणका दिल्या नंतर 23-08-2022 रोजी कचरा टाकण्याचा बंद झाला व पाणी कनेक्शन चालू केले या वेळी महाराष्ट्र प्रभारी अमित पावले , कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत चौगले,हातकलंगले तालुका अध्यक्ष नितीनजी माळकरी,कागल तालुका अध्यक्ष राहुलजी कांबळे,पन्हाळा तालुका अध्यक्ष मिलिंद सामुद्रे व शाखा अंबप चे कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.त्यांनी वंचित न्यूज चॅनेल चे आभार मानले.


Vanchit News