Vanchit News

उचल मधील विद्यार्थ्यास मारहाणप्रकरणी शिक्षिकेला निलंबित करण्याची मागणी.वंचित न्यूज चॅनेल: शाहूवाडी तालुका प्रतिनिधी :- सखाराम कांबळे दिनांक:-9/9/2022 शाहूवाडी- मलकापूर पैकी उचल प्राथमिक शाळेतील पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या आरुष अरविंद कांबळे या मागासवर्गीय विद्यार्थ्यास अमानुषपणे मारहाण करणाऱ्या हेमलता कुंभार या शिक्षिकेवर गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबित करावे अन्यथा गुरुवार दिनांक 15 पासून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे आप्पा यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर श्रीकांत कांबळे आप्पा मानसिंग आडके आकाश कांबळे जनार्दन कांबळे प्रदीप माने आदींच्या सह्या आहेत.


Vanchit News