Vanchit News

बावडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ,नागनाथ गुरुसिद्ध पाटील हे राष्ट्रपती शौर्य पुरस्काराने सन्मानित.वंचित न्यूज चॅनेल. दि.१४/१०/२०२२ उपसंपादक :सतीश जगताप. नागनाथ गुरुसिद्ध पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण या गावचे रहिवासी असून २०१५ साली पोलिस उपनिरीक्षक म्हणून ते भरती झाले. गडचिरोली जिल्ह्यातील दरमंचा या उप पोलीस ठाण्यामध्ये पोलीस उप निरीक्षक या पदावरती काम करत होते .या वेळेस नक्षल प्रवण क्षेत्रात जवळ जवळ दहा करवाया करण्यात या कारवाई मध्ये त्यांनीं चार नक्षल वाद्यांचा खात्मा केला ,आठ नक्षलींना अटक ,केली,व दोन नक्षलींना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले. उत्तरोत्तर त्यांच्या कामगिरीचा आलेख हा वाढतच गेल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील या कामगिरीबद्दल त्यांना २०१८ साली सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदी बढती मिळाला. यानंतर २०२१मध्ये त्यांना पोलीस महासंचालक पदकाने ही सन्मानित केले. नागनाथ गुरुसिद्ध पाटीलहे मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण या छोट्याशा गावातील सर्वामान्य विद्यार्थी आपल्या आई-वडिलांची इच्छा व जिद्द व चिकाटीच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक झाले व त्यांचा कामगिरीचा आलेख हा वाढत चालल्यामुळे त्यांच्या या कामगिरीची दखल प्रशासनाने घेऊन त्यांना राष्ट्रपती शौर्यपदक बहाल केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही वर्ष पुण्यातील खाजगी कंपनीमध्ये त्यांनी नोकरीही केलेली आहे. दिनांक १३ ऑक्टोबर २०२२ रोजी मुंबईतील राजभवनातील दरबार हॉल मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या उपस्थितीत राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती शौर्य पदकाने यांना सन्मानित केले. त्यांच्याबरोबर अन्य ११४पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनाही सन्मानित करण्यात आले. सध्या नागनाथ पाटील हे बावडा पोलीस स्टेशन या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहत आहेत.याही भागातील सर्व अवैद्य धंद्यावरती व गुन्हेगारांवरती त्यांची करडी नजर असून ते अनेक कारवाया याही भागात अतिशय चालाखीने पार पाडीत आहेत. नागनाथ पाटील हे दिसायला अतिशय शांत व संयमी वाटतात परंतु नक्षली भागामध्ये काम केले असल्यामुळें त्यांचा तपास यंत्रणेतील तांत्रिकपणा हा आतिशय सखोल व अभ्यासपुर्ण आहे हेच प्रकर्षांने जाणवते.‌ या कामगिरीची चर्चा सर्वत्र ऐकावयास मिळत आहेत.


Vanchit News