Vanchit News

पाटण येथे महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री मा.चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा रिपब्लिकन सेनेतर्फे निषेध.



वंचित न्यूज चॅनेल: पाटण तालुका वंचित न्यूज प्रतिनिधी// हणमंत कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील महात्मा ज्योतिबा फुले यांनी लोकांकडे भीक मागून शाळा सुरू केल्या असे विधान करून मंत्री चंद्रकांत पाटलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अपमान केलेला आहे. त्यामुळे अशा महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण मंत्र्यानी केलेल्या व्यक्तव्याचा रिपब्लिकन सेना पाटण तालुका तीव्र निषेध करीत आहे.कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले महामानव यांची भीक मागून शाला चालू केल्या असे व्यक्तव करणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील यांना आम्हाला सांगावसं वाटतंय की बहुजनांच्या मुलाना शिक्षणाची दार इतकी जोमात खुली नव्हती तर मोठ्या संघर्षतुन कर्मवीर भाऊराव पाटील महात्मा फुले यांनी शिक्षणाचे दरवाजे उभेे केले आहेत आणि त्यामुळेच सर्वजन शिक्षण घेऊ लागले. जाणीवपूर्वक महापुरुषाचा अपमान करण्याचा मंत्री पाटील यांनी विडा उचलला आहे.त्यामुळे रिपब्लिकन सेना पाटण तालुका वतीने तीव्र निषेध व्यक्त करून इथून पुढे जे नेते महापुरुषाचा असे व्यक्त्व करून अपमान करतील त्या नेत्याना पाटण तालुक्यात काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात येईल.भविष्यात कोणीही नेत्यानी महापुरुष यांचा अपमान होईल असे व्यक्तव करु नये अन्यथा भविष्यात पाटण तालुक्यात मोठे आंदोलन ऊभे करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन सेना पाटण तालुका अध्यक्ष सचिन कांबले कुसरुंड, तालुका सचिव प्रकाश कांबले, उपाध्यक्ष सुधाकर देवकांत, यांचेसह युवक कार्यकते, पदाधिकारी रिपब्लिकन सेना कार्यकते यानी दिला आहे.






Vanchit News