Vanchit News

कोल्हापूर:भाजी विक्रेता तरुण झाला वरेवाडीचा सरपंच.वंचित न्यूज चॅनल: शाहूवाडी प्रतिनिधी सखाराम कांबळे. शाहुवाडी तालुक्यातील वारेवाडी तील एक साधा भाजी विक्रेता तरुण थेट सरपंच पदावर विराजमान झाला आहे. आनंदा राजेंद्र भोसले असे निवडणुकीत विजय मिळवलेल्या तरुणाचे नाव आहे. शिवसेनेचा (ठाकरे गट) कडवट आणि सच्चा सैनिक म्हणून आनंदा सूपरिचत आहे. दुर्गम डोंगरपारित वसलेल्या या वारेवाडी ची ओळखच मुळात बाजार समितीला हमाल पुरविणारे गावाअशी आहे. यातून आनंदा भोसले हा तरुण भाजी विक्रेता बनला किंबहुना या व्यवसायात आला. बांबवडे परिसरात भोसले यांचे माजी विक्री त्याचे दुकान आहे.आनंद भोसले हे ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून सरपंच पदाच्या निवडणूक रिंगणात होते. त्यांना 391 मध्ये मिळाली. त्यांच्याविरोधात उभा राहिलेला विश्वास भोसले (जनसुराज्य शक्ती) 330 मध्ये मिळाली. आनंद भोसले यांचा साठ मतांनी विजयी झाल्याचे समजताच वारेवाडी सह बांबवडे पंचक्रोशी ते कौतुकाचा विषय ठरले आहेत.


Vanchit News