Vanchit News

*नांदेड येथे मनुवादी विचारसरणीतुन बौध्द युवकाचा झालेल्या खुनाच्या घटनेचा इंदापूर तालुक्यात निषेध



वंचित न्यूज चैनल उपसंपादक :सतीश जगताप दि.०४/०६/२०२३ आज शनिवार दि. ३ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजता इंदापूर तालुक्यात वालचंदनगर पोलीस स्टेशन, जंक्शन येथे "मी आंबेडकरवादी" सामाजिक संघटनेच्या वतीने व इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने नांदेड येथील मनुवादी विचारसरणीतुन बौध्द युवकाचा जो खुन झाला त्याचा निषेध नोंदवुन त्या घटनेबद्दल निवेदन दिले. या वेळी निवेदकांनी हा खुन खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुन आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी शासनाने, पोलीसांनी प्रयत्न करावेत तसेच असे न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. हे निवेदन वालचंदनगर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे सर यांनी स्विकारले. यावेळी मी आंबेडकरवादी सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे, जेष्ठ पॅंथर सु.ग.साबळे , ग्रामपंचायत सदस्य संतोष ( पिपा )लोंढे , चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते प्रकाश कांबळे, पुंडलिक सोनवणे सर, मी आंबेडकरवादी सामाजिक संघटनेचे राजशिष्टाचार समिती चे आप्पासो कदम, सामाजिक कार्यकर्ते घनःश्याम निंबाळकर, पंकज बनसोडे, भैय्यासाहेब सोनवणे, नानासाहेब साळुंखे, अमित घोडके, राष्ट्रीय सामाज पार्टी चे आकाश पवार, कळस चे सागर कांबळे, आकाश कांबळे, रोहीत सोनवणे, माणिक तुपे, आशिष भागवत, सतिश वाघमारे, विशाल सोनवणे, प्रणव वाघमारे, करण खाडे, ऋतुज वनसाळे, प्रथमेश खरात, संतोष वाघमोरे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महापुरुषांच्या घोषणा देण्यात आल्या.






Vanchit News