Vanchit News

*राष्ट्रवादी ने केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची नौटंकी भाजप ने करू नये- तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे



वंचित न्यूज चैनल उपसंपादक: सतीश जगताप दि.०१/०६/२०२३ राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांचा हर्षवर्धन पाटील यांच्यावर घणाघात. इंदापूर तालुक्यात उद्या होणारा केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या हस्ते उद्धट प्रादेशिक योजनेचा भूमिपूजन कार्यक्रम हा शासकीय कार्यक्रम नसून राजकीय कार्यक्रम असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी केले यावेळी बोलताना कोकाटे यांनी सांगितले की जर शासनाच्या शासकीय प्रोटोकॉल प्रमाणे कार्यक्रम घ्यायचा असल्यास निमंत्रण पत्रिकेमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधीचे म्हणजेच खासदार आमदार मग ते कोणत्याही पक्षाचे असो त्यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेमध्ये प्रोटोकॉल नुसार टाकावे लागते भाजप पक्ष हा आपण न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी वास्तविक पाहता अशा प्रकारचे प्रोटोकॉल मध्ये मोडतोड करून एका राजकीय कार्यक्रमात भूमिपूजन करण्याचा घाट घातला आहे या कार्यक्रमांमध्ये भाजपच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याचा अधिकार नव्हे कसलाही संबंध नाही जलजीवन मिशन अंतर्गत सदर योजनेचा आराखडा हा तत्कालीन पालकमंत्री अजित दादा पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 12 मार्च 2021 च्या मीटिंगमध्ये संपूर्ण जिल्ह्याच्या आराखड्यास तत्कालीन पालकमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी मंजुरी दिली होती त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघात आमदारांना विश्वासात घेऊन त्या त्या तालुक्याचे आराखडे बनवण्याचे काम केले होते त्याचप्रमाणे इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी इंदापूर मधील प्रत्येक गाव वाडी वस्ती यामध्ये लक्ष घालून त्या योजनेचे आराखडे तयार करणे अंदाजपत्रक तयार करणे सर्वेक्षणामध्ये मार्गदर्शन करणे इत्यादी गोष्टी स्वतः आमदार या नात्याने लक्ष घालून करून घेतल्या वेळोवेळी त्या त्या विभागाचे अधिकारी यांचे सोबत आढावा मीटिंग घेतल्या व या मीटिंगमध्ये योग्य त्या अडचणींना मार्ग काढून योजना निविदा प्रक्रियेपर्यंत लवकरात लवकर कशा जातील यामध्ये लक्ष घातले व योजना मार्गे लावण्याचे काम आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी मनापासून केले सध्या तालुक्यातील भाजपला दुसऱ्याचे श्रेय घेण्यापलीकडे कोणतेही काम राहिलेलं नाही एकाही कामात त्यांचे योगदान आपणास कुठे दिसणार नाही परंतु काम मंजूर झाले की लगेच नारळ फोडायची लगबग लबाड भाजप नेत्यांमध्ये आपल्याला पहावयास मिळेल . केंद्रीय मंत्री पटेल साहेबांनी महागाई ,बेरोजगारी,वीज बिल, शेतकऱ्यांची कर्जमाफी आदी मुद्यांवर बोलावे असे कोकाटे यांनी आवाहन केले. त्यामुळे आपल्या माध्यमातून एकच सल्ला राहील सामान्य जनता हे सर्व बघत असते त्यामुळे हे जनतेला लबाडाचा आवतन कधीच जेवल्याशिवाय मान्य होणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अगोदर फिल्डवर जाऊन काम करा आणि मगच कोणत्याही कामाचं श्रेय घ्या असा सल्ला हनुमंत कोकाटे यांनी भाजपला दिला






Vanchit News