*अखेर पाटण शहरातील "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना" सुरू*

वंचित न्यूज चैनल वंचित न्यूज पाटण तालुका प्रतिनिधी हणमंत कांबळे दि.०९/०८/२०२३ संपूर्ण महाराष्ट्र राज्यात १ में रोजी महाराष्ट्र दिनाचे औतिच्य साधून " हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना " चे ऑनलाइन उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे हस्ते झाले. त्याचबरोबर पाटण शहरामध्ये पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधि तथा उत्पादन शुल्क मंत्री तसेच सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पाटण पंचायत समिती शेजारी देखील आपला दवाखाना सुरू करणेत आला. सुरवातीला हा दवाखाना चांगल्या प्रकारे काही महिने सुरू होता. तद्नंतर काही तांत्रिक अडचणी मुळे या दवाखान्यामध्ये असणारे वैद्यकीय अधिकारी हजर होऊ शकले नाहीत. त्यामुळे तो बंद होता. आता या दवाखान्यामध्ये नवीन वैद्यकीय अधिकारी नियुक्त करून हा दवाखाना पुर्ववत सुरू करणेत आला आहे. तरी नागरीकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन " हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना " च्या प्रशासनाने केले आहे. हा दवाखाना निशुल्क असून या दवाखान्याची वेळ दु. २ ते रात्री १० पर्यंत आसून या दवाखान्यामध्ये मोफत औषदोपचार , मोफत प्रयोगशाळा तपासणी ( रक्त तपासणी ) , टेलीकन्सलटेशन , गर्भवती महिलांची तपासणी , व लसिकरण या तपासण्या केल्या जाणार आहेत. तसेच , महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी , बाह्ययंत्रणेद्वारे रक्त तपासणी सोय , मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा , आवश्यकतानुसार विशेषज्ञ सेवा पुरविल्या जाणार आहेत. असे वैद्यकीय अधिकारी पुजा शर्मा यांचेकडून सांगण्यात आले आहे. सर्व सामान्य नागरीकांची अडचण होत आहे . हे लक्षात येताच ना. शंभूराज देसाई साहेब यांचे आदेशानुसार " हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना " पुर्ववत सुरू व्हावा यासाठी शिव सेना महाराष्ट्र राज्यचे पाटण तालुका अध्यक्ष श्री. इरफान सातारकर यांनी मुख्याधिकारी कार्यालय सातारा , जिल्हा आरोग्य अधिकारी सातारा , तालुका आरोग्य अधिकारी सातारा , यांना फोनवरून व प्रभारी गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन तसेच कक्ष अधिकारी यांना भेटून पाठपुरावा केला.**