बावडा परिसरामध्ये महाराष्ट् शासनाचा महिला व बालविकास विभागाकडून देण्यात येणारा पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर पुरस्काराचे शासकीय नियमानुसार वितरण

वंचित न्यूज चैनल उपसंपादक: सतीश जगताप महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून नुकताच जाहीर झालेला अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रत्येक गावातील दोन सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांना देण्याचे शासन स्तरावरून परिपत्रक निघाल्यानंतर बावडा परिसरातील बावडा, निरा नरसिंहपुर ,गिरवी ,पिंपरी बुद्रुक ,गोंदी ओझरे व परिसरातील सर्वच गावातून कोरोना काळामध्ये अतिशय उत्कृष्ट अशी आरोग्य सेवा देणाऱ्या अशा सेविका त्याचबरोबर अंगणवाडी सेविका व इतर सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नावाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. बावडा या ठिकाणी सरपंच किरण पाटील,ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब कांबळे,ग्रामसेविका अंबिका पावसेव समानार्थी अशा सेविका रफिया तांबोळी तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. पिंपरी या ठिकाणीअशा सेविका स्वाती पाटील व अशा सेविका सारिका वाघमारे यांचाही सन्मानसरपंच सौ. ज्योति श्रीकांत बोडके,श्रीकांत बापू बोडके,इतर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. निरा नरसिंहपुर या ठिकाणीआशा सेविका देवळे,व अंगणवाडी सेविका यांचा सन्मान सौ आश्विनी चंद्रकांत सरवदे,विठ्ठल देशमुख,विजय भाऊ सरवदे,पप्पू गोसावी,सर्व सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा पार पडला. गोंदी वझरे या ठिकाणीं आशा सेविका सुरेखा क्षीरसागर,वआशा सेविका रूपाली पवारयांचा सन्मान सरपंच प्रतिनिधी रंजीत वाघमोडे ,ग्रामसेवक गणेश लंबा ते इतर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.