Vanchit News

नीरा नरसिंहपुर येथील नविन पोलिस ठाण्याची पाहणी पोलिस अधिक्षक पुणे ग्रामिण मा. अंकित गोयल यांच्याकडून करण्यात आली.वंचित न्यूज चैनल निरा नरसिंहपुर: दिनांक-८; उपसंपादक: सतीश जगताप : महाराष्ट्र राज्यमधील तीर्थक्षेत्र निरा नरसिंहपुर येथील विकास कामाची पाहणी करण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक ग्रामीण अंकित गोयल यांनी निरा नरसिंहपुर गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी नवीन पोलीस स्टेशनच्या इमारतची, सरकारी दवाखान्याच्या इमारतीची पाहणी केली. त्याच्यानंतर माणकेश्वर वाडा येथे झालेल्या नवीन भक्त निवासाची पाहणी केली. येथे येणाऱ्या भक्तांसाठी असणाऱ्या सुख सोयींचे तसेच त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक त्या गोष्टींची चौकशी केली. सर्व कामांची पाहणी केल्यानंतर अंकित गोयल हे नरसिंह मंदिरामध्ये देवदर्शनासाठी गेले. मंदिरामध्ये भैय्या दंडवते यांनी साहेबांकडून आरती करून घेतली. देव दर्शन करत असताना त्यांनी मंदिराची सर्व माहिती घेतली.यावेळी त्यांना माहिती देण्यासाठी डॉक्टर सिद्धार्थ सरवदे, सागर काकडे, नाथाजी सुरू आदी मान्यवर होते. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकास कामाची पाहणी करताना पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे, इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार,सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस कॉन्स्टेबल कळसाईत, पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड, पोलीस स्टाफ बारामती,इंदापूर तसेच निरा नरसिंहपुर गावचे सरपंच प्रतिनिधी विजय सरवदे, प्रभाकर जगताप उपस्थित होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख भोसले साहेब उपस्थित होते


Vanchit News