इंदापूर तालुक्यातील मसोबाची वाडी येथील विहिरीची रिंग कोसळून चार मजूर गाडले आद्याप शोधकार्य सुरूच

वंचित न्यूज चॅनल उपसंपादक: सतीश जगताप इंदापूर तालुक्यातील महसोबाची वाडी येथील विहिरीची रिंग कोसळून चार मजूर मातीच्या खाली गाडले गेले आहेत तीन दिवसांपासून शोध सुरूच आहे विहिरीत माती चा मलबा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे व विहिरीची उंची साधारणपणे १३०फूट खोल आहे त्यामुळे विहिरीतील माती काढणे खूप कठीण झाले आहे. हे सर्व मजुर बेलवडी येथील आहेत. आज उशिरा मोठे पोकलेन मशीन विहिरीत सोडून माती काढणेचा प्रयत्न प्रशासन करीत आहे . कालपासून इंदापूरचे आमदार माजी मंत्री दत्तात्रय भरणे. व इंदापूरचे तहसीलदार पाटील हे घटना स्थळावर स्वतः हजर राहून व एन. डी. आर. एफ.चे पथक परिश्रम घेत आहेत आज संध्यकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल