Vanchit News

इंदापूर तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेतवंचित न्यूज चैनल उपसंपादक: सतीश जगताप इंदापूर तालुक्यात जून महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकरी हैराण झालेले आहेत. इंदापूर तालुक्याचा बराच भाग हा ऊस क्षेत्र लागवडीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असून याच भागातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय संभ्रमित आहे. इंदापूर तालुक्यात १५/०७ या दिवशी उसाची लागण केली जाते, परंतु मोठा पाऊस न पडल्यामुळे व धरणामध्ये फक्त 13 टक्के पाणीसाठा असल्यामुळे शेतकऱ्यांना लागण करावी की नको अशी अवस्था झालेली आहे, त्यामुळे यंदा ऊस क्षेत्राच्या लागवडीचा दर हा कमी होणार आहे याचा परिणाम या ऊस कारखान्यांवरती होणार आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये कसलाच पाऊस पडला नसल्यामुळे राहिलेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये परतीचा पाऊस पडेल का? याचीही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे भविष्यात दुष्काळग्रस्त अवस्था ही इंदापूर तालुक्याची होईल हे चित्र आता तरी दिसू लागले आहे


Vanchit News