Vanchit News

**तीर्थ क्षेत्र नीरा नृसिंहपुर च्या सरपंचपदी सौ.अर्चना नितीन सरवदे यांची बिनविरोध निवड** *निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून .श्री. हागारे एस. बी. यांनी काम पाहिले.*निरा नरसिंहपुर: दिनांक- 26, वंचित न्युज सह संपादक श्री. सतीश जगताप. निरा नरसिंहपुर गावाच्या सरपंच पदाची निवडणूक आज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घेण्यात आली या कार्यक्रमासाठी निवडणूक अधिकारी तथा अध्यक्ष अधिकारी एस .बी. हगारे, निरा नरसिंहपुर गावचे तलाठी एस.टी . बिराजदार, नीरा नरसिंहपूरचे ग्रामसेवक महेश कुमार म्हेत्रे यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली.यावेळी निरा नरसिंहपुर ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपस्थित होते . सर्व सदस्यांच्या विचाराने आणि एक मताने ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली . या कार्यक्रमासाठी पंचायत समिती मा. सदस्य प्रदीप मामा जगदाळे हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी निरा नरसिंहपुर गावचे सरपंच प्रतिनिधी चंद्रकांत सरवदे, विजय सरवदे, आनंद काकडे, तंटामुक्त अध्यक्ष दशरथ राऊत, माजी उपसरपंच विठ्ठल देशमुख ,सुनील मोहिते, नरहरी काळे, माजी सरपंच अण्णासाहेब काळे, जगदीश सुतार, अतुल घोगरे भाऊसाहेब ,विठ्ठल वाघमोडे, सौ. रेणुका काकडे, सौ. कोमल मोहिते, सौ .रूपाली कोळी, सौ. जयश्री राऊत, गुरुदत्त गोसावी, नाथाजी मोहिते पाटील , तुकाराम बंडलकर, किशोर मोहिते , प्रशांत बादले पाटील, दत्तात्रेय वसंत गायकवाड पाटबंधारे खात्याचे अधिकारी, मिथुन कांबळे, हिरामण लोंढे, सिने अभिनेते चंद्रकांत लोंढे, नेताजी शिवाजी लोंढे, सौ. निलावती वसंत गायकवाड, सौ. कीर्ती महेश कुमार म्हेत्रे, विनोद लोखंडे , सिद्धू कांबळे ,जानवे दत्तात्रय गायकवाड, शहाजी पावशे, प्रणव पराडे ,धनंजय पवार, एकनाथ सरवदे, नारायण सरवदे ,लखन सरवदे आणि इतर नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते. निवडीच्या कार्यक्रमानंतर नवनियुक्त सरपंच अर्चना नितीन सरवदे यांची भव्य दिव्य अशी रथातून मिरवणूक काढण्यात आली. सरपंच पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपण सर्व सामान्य माणूस समोर ठेवून गरिबा तील गरीब व सर्वच प्रश्न सोडवू असा विश्वास सरपंच सौ . अर्चना नितीन सरवदे यांनी व्यक्त केला.


Vanchit News