*बांबवडे मध्ये साखळी उपोषण*

कोल्हापूर प्रतिनिधी :- मिलिंद सामुद्रे दि.29-10-2023 रोजी बांबवडे ता. शाहुवाडी येथे सकल मराठा समाजाने मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या चाललेल्या आंदोलनास पाठिंबा दर्शवत सुनील पाटील, सचिन मुडशिंगकर, तुषार पाटील, महेश पाटील, बाळासो रवंदे आणि सकल मराठा आंदोलक यांनी बांबवडे येथे आज रोजी साखळी उपोषण सुरु केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या साठी आंदोलनास ता.शाहूवाडी, ता.पन्हाळा मधील संघटना, पक्ष येऊन पाठिंबा दर्शवीत आहेत यामध्ये भारतीय दलित महासंघ या संघटनेने आपला पाठिंबा दर्शवीत मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत असे आश्वासन भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्रीकांत कांबळे (आप्पा ) यांनी दिले. या वेळी अभिजित बनसोडे, चंद्रकांत काळे, बबलू चौगले, आकाश कांबळे, अमोल कांबळे,मानसिंग आडके, विक्रम सामुद्रे, गणेश कांबळे इ. कार्यकर्ते उपस्तित होते.