Vanchit News

* दिनांक 2 नोव्हेंबर 2023 रोजी *टेंभूर्णी* ता. माढा जि. सोलापूर येथे जय मल्हार संघटना महाराष्ट्र राज्याचे *उपाध्यक्ष श्री अंकुश जाधव सर यांच्या संकल्पनेतून* सोलापूर जिल्ह्यातील रामोशी बेरड बेडर समाजातील लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी " *जनता दरबार "* आयोजित करण्यात आला होताजिल्ह्यातील रामोशी बेरड बेडर समाजातील लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी " *जनता दरबार "* आयोजित करण्यात आला होता. प्रथम आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नंतर जाधव सर यांनी जनता दरबार भरवण्यामागचा उद्देश सांगितला. जिल्ह्यातून अनेक समाज बांधवांनी आपल्या अडचणी, अनेक प्रश्न जनता दरबार मध्ये मांडले.जवळपास २७ समाज बांधवांनी आपले प्रश्न मांडले. ते सर्व मार्गी लावण्यात आले. पहिल्याच जनता दरबार मध्ये अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते श्री. विष्णु (आपा) चव्हाण यांनी या उपक्रमाचे कौतुक करत समाज बांधवांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. त्यावेळी युवक अध्यक्ष श्री सुधीर (दादा) नाईक यांनी अशा प्रकारचे जनता दरबार प्रत्येक जिल्ह्यात भरवले पाहिजेत असे मत व्यक्त केले. जिल्हा अध्यक्ष श्री उमेश (भाऊ)मंडले यांनी प्रत्येकाच्या अडचणींवर निर्णायक मत मांडले. श्री किरण चव्हाण (महुद ) यांनी शासकीय योजनाच्या प्रश्नावर उत्तर दिली. यावेळी शेतकरी आघाडी अध्यक्ष श्री बापुसाहेब जाधव, वाहन चालक मालक संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब माने, चव्हाण साहेब शेवरे, युवक संघटक शरद गूजले,चव्हाण मेजर पिंपळनेर, युवक सचिव अतुल पाटोळे,बापुसाहेब बोडरे,राजाभाऊ चव्हाण, बंडूभाऊ जाधव तांबवे,भाऊ मसुगडे,कालिदास पाटोळे,लक्ष्मण जाधव,चांगदेव माने,संजय माने, बाळु जाधव, नवनाथ चव्हाण, विजय चव्हाण, गोविंद चव्हाण, मंडले बेगमपुर , सचिन मंडले,बिभीषण माने, अक्षय शिर्तोडे ,गणेश मंडले,भाऊ माने . आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार नितीनआबा जाधव ,जय मल्हार क्रांती संघटना युवक कार्याध्यक्ष सोलापूर जिल्हा यांनी मानले


Vanchit News