Vanchit News

इंदापूर तालुका मातंग एकता आंदोलन संघटनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष मा. शरदराव गायकवाड़ यांची गाव तेथे शाखा निर्माण करण्याची संकल्पना.वंचित न्युज चैनल : दि.:२९/१२/२०२२. बावडा, उपसंपादक :सतीश जगताप महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्य मंत्री मा.रमेश दादा बागवे यांची संकल्पना प्रत्यक्षांत उतरविण्यासाठी इंदापूर तालुक्यात मातंग एकता आंदोलन संघटनेचे नुतन तालुका अध्यक्ष शरद गायकवाड़ तालुका अध्यक्षपदाचा पदभार हाती घेताच इंदापूर तालुक्यातील खेडोपाडी फिरून शाखा निर्माण करण्याची जिद्द ठेवून माजी गृहराज्य मंत्री रमेश दादा बागवे यांचे स्वप्न आपण इंदापूर तालुक्यात प्रत्यक्षात साकार करणार आहोत.असे कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले. गिरवी टनु ,पिंपरी, निरा_ नरसिंहपूर व बावडा परिसरात आपण प्रथमतःशाखा उद्घाटनाचे कार्यक्रम घेणार आहोत.असे नूतन तालुकाध्यक्ष शरद गायकवाड यांनी कार्यकर्त्यांशी बोलत असताना सांगितले. याप्रसंगी गिरवी या ठिकाणी रणदिवे परिवार यांचे कडून मातंग एकता आंदोलन इंदापूर तालुकाध्यक्ष शरद गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला व पोलीस पाटील दिलीप रास्ते, यांचाही सत्कार रणदिवे परिवाराकडून करण्यात आला. यानंतर टणू मोहिते परिवाराकडून नूतन तालुकाध्यक्ष शरद गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला, तसेच दिलीप रास्ते यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला.यावेळी बैठकीला संभाजी मोहिते, दत्तू मोहिते,हरिदास मोहिते, दिलीप मोहिते ,भगवान मोहिते,सत्यवान मोहिते,विकास मोहिते,नेताजी मोहिते,गुलाब मोहिते, विठ्ठल मोहिते,खंडेराव मोहिते,आदी समाज बांधव उपस्थित होते.


Vanchit News