Vanchit News

इंदापूर तालुक्यातील शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर शहर व बावडा परिसरामध्ये पोलिसांचे पथसंचलन.वंचित न्यूज चैनल : उपसंपादक: सतीश जगताप. दि.२१/०२/२०२३. १९ फेब्रुवारी : इंदापूर. तालुक्यामध्ये होत असणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून इंदापूर शहर व परिसरा मध्ये जयंती उत्सवाच्या ठिकाणी पोलिसां मार्फत D/102रॅपिड ॲक्शन फोर्स तळोजा नवी मुंबई,व स्थानिक पोलीस प्रशासन यांचे मार्फत जोरदार शस्त्रधारी फोर्स मार्फत पथसंचलन करण्यात आले. सदर पथसंचलनात 30 पोलीस अमलदार इंदापूर पोलीस स्टेशन,यांनीही सहभाग घेतला होता. गेल्या अनेक दिवसा पासून इंदापूर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर इंदापूर तालुक्यातील पोलीस प्रशासन अगदी सक्रियपणे काम करीत आहे उप कमांडेड. श्री माओतोशी सहाय्यक कमांडेड.श्रीमती स्वाती तांदळे पोलीस निरीक्षक श्री पवन कुमार सब इन्स्पेक्टर श्रीमती सुशीला D/102 रॅपिड ऍक्शन फोर्स तलोजा नवी मुंबई एकूण कमांडो 60 दिलीप पवार पोलीस निरीक्षक इंदापूर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे नागनाथ पाटील पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडोळे महिला पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव व 30 पोलीस अंमलदार इंदापूर पोलीस स्टेशन आदींनी सहभाग घेतला होता.


Vanchit News