Vanchit News

देवर्डे ता.भुदरगड जि.कोल्हापूर च्या उपसरपंच पदी वंचित बहुजन आघाडीच्या सौ. विद्या सुरेश जाधव यांची निवड झाली.वंचित न्यूज चॅनेल:- कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी: मिलिंद समुद्रे. श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारातुन भुदरगड तालुक्यातील देवर्डे येथे पहिल्यांदाच तीन सदस्य सौ.पुजा सुनिल जाधव,श्री. जयसिंग श्रीपती जाधव हे राखीव प्रभागामधून बिनविरोध झाले व सौ.विद्या सुरेश दिनकर जाधव ह्या जनरल प्रभागामधून बिनविरोध झाल्या.काल त्यांची उपसरपंच पदी निवड करणेत आले . या ठिकाणी शिवसेना चार सदस्य. वंचित बहुजन आघाडी तीन सदस्य व सरपंच एकच राष्टवादी कॉंग्रेस. या ठिकाणी समसमान मते झाली व त्या ठिकाणी सरपंच यानी वंचित बहुजन आघाडीच्या सौ.विद्या सुरेश जाधव यांनी निर्णायक मतदान करून विजय घोषित करणेत आले.सौ.विद्या जाधव ह्या कोल्हापूर जिल्हाउपाध्यक्ष सुरेश जाधव यांच्या पत्नी आहेत.या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी सौ.खतकर मॅडम व सौ.कळमकर मॅडम,पाटील मॅडम व खाडे साहेब यांनी काम पाहीले. या वेळेस उपस्थित पोलिस पाटील आशोक जाधव,दिलीप जाधव,सुनिल जाधव,आश्रू जाधव,आशोक जाधव,धनाजी जाधव,भिमराव जाधव,प्रकाश जाधव,ईश्वरा जाधव,बबन जाधव,सतिश जाधव रमेश जाधव,संभाजी जाधव,श्रावण जाधव,संतोष जाधव,मधुकर जाधव,बाळू जाधव हे व अन्या कार्य कर्ते उपस्थित होते.


Vanchit News