Vanchit News

इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी गावामध्ये प्राथमिक शाळेकडून आनंदी बाजाराचे आयोजन.ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.वंचित न्यूज चॅनेल: उपसंपादक :सतीश जगताप. दि.१८/०१/२०२३. इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमार्फत आनंदी बाजार या संकल्पनेतू विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारिक ज्ञान निर्माण व्हावे योग्य आकडेमोड या विषयाचे ज्ञान व्हावे व उद्याचा व्यवहारिक नागरिक व्हावा ,हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,लुमेवाडी या ठिकाणीं शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर शिक्षण समिति अध्यक्ष शकील काझी, सरपंच प्रतिनिधी सुनील जगताप माजी सरपंच, कमाल जमादार,शहाबान सय्यद सर अनिल शेख,भीम शक्ती सामाजिक संघटनाचे सुनील चव्हाण इत्यादी मान्यवरांनी आयोजनामध्ये सहकार्य केले जवळ जवळ 275 पट असणारी बावडा जिल्हा परिषद गटातील ही एकमेव शाळा ही आदर्श शाळा म्हणूनही नावाजलेली आहे. फत्ते मोहम्मद जोधपुरीबाबाच्या दर्ग्यासमोर हा बाजार भरवण्यात आला होता हा आनंदी बाजार नसुन आठवडी बाजार आहे असेच चित्र निर्माण झाले होते आपल्या लुमेवाडी गावात आठवडी बाजार भरला जावा असेही लोकांमधून चर्चा होती सदर आनंदी बाजाराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


Vanchit News